मुंबई : मुंबईत स्वतःचे घर असावे, हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वाढत्या मालमत्ता दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी हे स्वप्न दूर जात असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ने मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील विविध वसाहतींमध्ये रिक्त असलेले एकूण 120 फ्लॅट्स ‘पहिले या, पहिले घ्या’ (First Come, First Serve) या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
17 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू
या योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व फ्लॅट्स यापूर्वी तीन वेळा लॉटरी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले होते; मात्र विक्री न झाल्याने आता थेट विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. इच्छुक नागरिकांनी विलंब न करता नोंदणी करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
घरांची किंमत किती?
या योजनेतील घरांच्या किंमती 31 लाख रुपयांपासून सुरू होऊन तब्बल 8 कोटी रुपयांपर्यंत आहेत.
-
सर्वात स्वस्त घर मानखुर्द (PMGP) परिसरात सुमारे 31 लाख रुपयांत उपलब्ध आहे.
-
सर्वात महाग फ्लॅट ताडदेव येथील ‘क्रीसेंट टॉवर’मध्ये असून त्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे.
-
याशिवाय वडाळा, लोअर परळ आणि अंधेरी परिसरातील फ्लॅट्सही या विक्री प्रक्रियेत समाविष्ट आहेत.
