Home महाराष्ट्र पुणे महानगरपालिकेचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात; समृद्ध परंपरा आणि आधुनिक विकासाचा...

पुणे महानगरपालिकेचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात; समृद्ध परंपरा आणि आधुनिक विकासाचा संगम

12
0
पुणे: ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशाने समृद्ध असलेल्या पुणे शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पुणे महानगरपालिका चा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान लाभला.
पुणे महानगरपालिकेची भव्य आणि ऐतिहासिक वास्तू ही केवळ प्रशासकीय इमारत नसून शहराच्या प्रगतीचा मार्ग आखणारे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी येथे घेतले जाणारे निर्णय पुण्याला सातत्याने नव्या उंचीवर नेत आहेत.

विकासाचा प्रवास

गेल्या काही दशकांत पुणे महानगरपालिकेने रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, उद्याने, शैक्षणिक सुविधा आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांद्वारे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. पर्यावरणपूरक उपक्रम, डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख धोरणे यामुळे पुणे देशातील आघाडीच्या शहरांमध्ये गणले जाते.
 कर्मचाऱ्यांचे योगदान
स्वच्छ, सुंदर, सक्षम आणि विकसित पुणे घडवण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पुणेकर बांधव-भगिनी हेच या यशाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या निष्ठा, कर्तव्यभावना आणि सेवाभावामुळेच शहर प्रगतीच्या मार्गावर स्थिरपणे वाटचाल करत आहे.
 भविष्याचा संकल्प
वर्धापन दिनानिमित्त शहर अधिक हरित, स्वच्छ आणि तंत्रज्ञानसंपन्न करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. वाहतूक कोंडी कमी करणे, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन आणि नागरिक सहभाग वाढवणे या बाबींवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या सर्व मान्यवरांना, कर्मचाऱ्यांना आणि पुणेकर नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. पुण्याची प्रगती अशीच अखंड सुरू राहो आणि शहर देशासाठी आदर्श ठरो, हीच महादेव चरणी प्रार्थना करण्यात आली.
Previous articleमहाराष्ट्र–पंजाब आध्यात्मिक नात्याला नवी दिशा; संत नामदेवांच्या घुमान येथे संतपीठाचा अभ्यास दौरा संपन्न
Next articleकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट; नेतृत्व व राष्ट्रनिर्मितीवर प्रेरणादायी मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here