भारतातील एकूण चार विमानतळं काही काळासाठी बंद राहणार आहेत.

Airport News:काही प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी 28 मार्चनंतरच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट बुकिंग अगोदरच थांबवले आहे.
या वर्षी रनवे रिपेअर करण्यासाठी हे चार विमानतळ काही काळासाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये जोधूपूर विमानतळ, श्रीनगर विमानतळ, पुणे विमानतळ, अहदमपूर एअर बेस यांचा समावेश आहे.
रनवेची डागडुगी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु ही डागडुजी नेमकी कधी होईल, याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. तर आदमूपर एअरबेस या वर्षाच्या शेवटी साधारण आठ महिन्यांसाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही विमानतळे सीमाभागात असल्याने लष्करासाठी खूप महत्त्वाची आहेत. या विमानतळांवरील रनवेवर फायटर जेट तसेच अन्य संरक्षणविषयक उड्डाणे होतात. सैन्याच्या विमानांच्या उड्डाणासाठी तेथील रनवे अनुकूल असणे गरजेचे असते. त्यामुळेच या विमानतळांच्या रनवेची डागडुजी वेळेवर केली जाते. या काळात विमानांचे मार्ग बदलले जातात. विमान प्रवासा उशिराने होतो.
