मुंबई:नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांची चावी व ताबापत्राचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर बीडीडी संकुला’तील 14 सदनिकांची चावी व ताबापत्राचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप केले.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
