शिमगा महोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन Konkan Railway प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Diva ते Chiplun दरम्यान अनारक्षित (Unreserved) MEMU विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. १ मार्च ते ८ मार्च २०२६ या कालावधीत ही विशेष सेवा दोन्ही दिशांनी दररोज धावणार आहे.
आरक्षणाशिवाय प्रवासाची सुविधा
शिमगा उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातून हजारो भाविक कोकणात जातात. यामुळे नियमित गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत अनारक्षित MEMU गाडी सुरू केल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची आवश्यकता नसून थेट तिकीट काढून प्रवास करता येणार आहे.
गाडी क्रमांक व वेळापत्रक
-
गाडी क्रमांक 01159 : दिवा स्थानकावरून रात्री ११:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
-
गाडी क्रमांक 01160 : चिपळूण येथून दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि रात्री ११:१० वाजता दिवा येथे पोहोचेल.
