Dubai Airport: दुबई विमानतळावर इराणचा पुन्हा ड्रोन हल्ला!

इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण आपल्या शेजारील देशांनाही लक्ष्य करत आहे. मंगळवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात इराणने दोन ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सतर्क सुरक्षा यंत्रणांनी हे दोन्ही ड्रोन हवेतच नष्ट केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दुबई मीडिया ऑफिस’ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ड्रोन नष्ट केल्यानंतर त्याचे अवशेष खाली पडल्यामुळे काही लोक जखमी झाले आहेत. यात एक भारतीय, एक बांगलादेशी आणि एक घानाचा नागरिक किरकोळ जखमी झाला आहे. सर्व जखमींना तातडीने प्रथमोपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
दुबई विमानतळावरील कामकाज थांबवण्यात आलेले नाही. विमानतळ आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे.
