Home Uncategorized राज्यात ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली...

राज्यात ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली जाईल,अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.

5
0

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी शिक्षण आणि प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय शाळांच्या तक्रारीनंतर हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी भाषा डावलली जात असल्याच्या मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सरकारकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.

राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही. आगामी शैक्षणिक वर्षात अशा शाळांची पुन्हा तपासणी केली जाईल. तसेच दोषी संस्थांवर कडक कारवाई होईल, असे दादा भुसे यांनी म्हटले.

Previous articleइराण-इस्रायल युद्धातून मिळालेले धडे:पंतप्रधान मोदींनी दिला आत्मनिर्भरतेचा संदेश
Next articleमुंबई :LPG संकट ने छीना मुंबईकरों का पसंदीदा नाश्ता, बंद हुए इडली-डोसा के कई स्टॉल।  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here