Home Uncategorized शालेय स्तरावर पथनाट्याद्वारे वसुंधरा जनजागृतीला चालना.

शालेय स्तरावर पथनाट्याद्वारे वसुंधरा जनजागृतीला चालना.

17
0

शालेय स्तरावर पथनाट्याद्वारे वसुंधरा जनजागृतीला चालना.

पिंपरी, दि. २३ मार्च २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “माझी वसुंधरा ६.०” अभियानांतर्गत वाकड गावठाण परिसरात पथनाट्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व वसुंधरा संवर्धनाची प्रभावी जनजागृती करण्यात आली.

जागतिक हवामान दिनानिमित्त पि. चि. मनपा शाळा, वाकड गावठाण येथे सादर करण्यात आलेले पथनाट्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि वसुंधरा प्रबोधनाचा अनोखा संगम ठरले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहा.आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहा. आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले आणि आरोग्य निरीक्षक कोमल फर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता, हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश, हवामान बदलाची कारणे, त्याचे गंभीर परिणाम तसेच दैनंदिन जीवनात करता येणाऱ्या सोप्या उपाययोजनांची माहिती नाट्यरूप सादरीकरणातून देण्यात आली.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगताना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे ओला, सुका, घरगुती घातक व सॅनिटरी कचऱ्याचे विलगीकरण तसेच घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता सवयी, कचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे. लहान वयातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मत सहा. आयुक्त किरणकुमार मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

 

Previous articleफैजू को पछाड़ शिव ठाकरे ने जीती शो की ट्रॉफी, लकी फैन को मिली 50 लाख की प्राइज मनी
Next articleहिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या शहीदी समागमानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी सुयोग्य नियोजन केल्याबद्दल महापौर रवि लांडगे यांचा करण्यात आला सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here