पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाचा पुन्हा एकदाउच्चांक!९६१ कोटींची कर वसुली.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कर संकलन विभागाची ९६१ कोटींचीवसुली, ६ लाख ३१हजार ६१५ मालमत्ताधारकांनी भरला कर
महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मानलेकरदात्यांचे आभार
पिंपरी, १ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व करआकारणी विभागाने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात तब्बल ९६१ कोटींहून अधिक रुपयांचा करवसूल केला आहे. महापालिकेने सलग दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटींचा टप्पा पार करत करवसुलीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ७ लाख ३२ हजार मालमत्ताधारकांपैकी ६ लाख ३१हजार ६१५ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या प्रामाणिककरदात्यांचे महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह सर्वपदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांचीनोंद असून, त्यापैकी ६ लाख ३१हजार ६१५ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्यावाढत असल्याचे दिसून येत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कर संकलनव कर आकारणी विभागाने गतवर्षी ९६६ कोटी रुपयांचा कर वसूल केला होता. यंदा महापालिकानिवडणुकीच्या कामात कर संकलन विभागाचे कर्मचारी तीन महिने गुंतले होते. त्याचापरिणाम मालमत्ता कर वसुलीवर झाला आहे.
यंदा कर वसुलीसाठी महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखालीउपआयुक्त सचिन पवार आणि कर संकलन व कर आकारणी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनीमोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे.
गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, मोठ्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी, मुख्य चौक, रस्तेइ. ठिकाणी होर्डिंग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मीडियाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पीकरवर थकबाकीदारांच्या नावांची घोषणा करणे, जाहिरात प्रसिद्धी, याचे फलित म्हणूनच ९६१ कोटी कर वसूल झाला आहे.
नागरिकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्धकरून देण्यात आली होती. मालमत्ताधारकांच्या विविध घटकांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन करसवलत योजना, थकित कर वसुलीसाठीवेळोवेळी घरभेटी देणे, पत्रदेणे,जप्तीपूर्व नोटिसा देण्याची कार्यवाही करण्यात आली.
