लोकसहभागातून आरोग्य समृद्धमहाराष्ट्रासाठी ; गाव आरोग्यसंपन्न करण्यावर भर द्यावा–सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर
गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्यसंपन्न ग्राम” म्हणून मानांकन-सार्वजनिक आरोग्य मंत्री

सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ‘माझंगाव,आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेचेउद्घाटन.
पुणे, दि. 1: “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे केवळ अभियाननसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेचया अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरभर देणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामुहिक वर्तणुकीत बदलघडविणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजविण्यावर या मोहिमेत भर देण्यात आल्यामुळे लोकसहभागाच्यामाध्यमातून आरोग्य संपन्न गाव करण्यावर भर द्यावा, असे आवाहनसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले.
या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्यसंस्था, जिल्हा व तालुका यंत्रणा,प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे व याठिकाणी कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका व आशा तसेच ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. एकात्मिककार्यप्रणाली व पारदर्शक मूल्यांकन प्रणालीच्या आधारे, या अभियानातूनगुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” म्हणूनमानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे, आरोग्य समृद्धमहाराष्ट्र घडविण्यासोबतच हे अभियान यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे यावे,असेही श्री. आबिटकर म्हणाले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीनेजिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणिकर्मचाऱ्यांकरिता श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय येथे आयोजित ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळाच्या उद्घाटनप्रसंगीते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, आरोग्यविभागाचे प्रधान डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन,शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, जिल्हा परिषदेचेमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड,सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मारुती नवले आदी उपस्थितहोते.
श्री. आबीटकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १०फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्याचा आणि त्याला आवश्यकती निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला आज पासून सुरुवात करण्यात आली, या अभियानातग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासोबतच लोकसहभागाच्या माध्यमाचा आरोग्याचा जागर करण्यातयेणार आहे. हे एक शासकीय अभियान न राहता यामध्ये अधिकाधिक लोकसहभाग घेत व्यापक आरोग्यचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करुया.
ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासोबतच निरोगी जीवनशैलीच्या दृष्टीकोनातून नागरिकांना दर्जेदारआरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अभियान यशस्वी करण्यासाठी विविधघटकांसोबत चर्चा करावी, त्यांच्या सूचनांचास्वीकार करुन समन्वयाने काम करावे, आगामी काळात त्याप्रमाणे आवश्यकते बदल करण्यात येतील.
राज्यातील एकही नागरिक आरोग्ययोजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनीकटिबद्धतेने काम करावे. हे अभियान आपल्या नागरिकांच्याआरोग्यदायी भविष्यासाठी राबविण्यात येत असून, ती चळवळ म्हणूनयशस्वी करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या अभियानाच्या यशासाठी आरोग्य विभागामार्फतआवश्यक सहकार्य करण्यात येईल.
राज्याच्या आरोग्य विभागाच्यामाध्यातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. गावपातळीपर्यंत आरोग्य सुविधाबळकटीकरणावर भर देण्यात आले. विभागामार्फत एकात्मिक आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांसारख्या राबविण्यात येणाऱ्याविविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहोचवून नागरिकांना आरोग्य सुविधादिल्या देण्याचे काम करावे. योजना यशस्वी करण्याकरिता लोकसहभागाची चळवळ म्हणून पुढेआले पाहिजे.
नवीन पिढीच्या सुरक्षिततेसाठीआणि कर्करोगासारख्या आजाराला रोखण्याकरिता राज्यातील 14 वर्षे वयोगटातील 9 लाख 84 हजार मुलींचे (ज्यांनी चौदावा वाढदिवस साजरा केला आहे परंतु पंधरावा वाढदिवसअद्याप झालेला नाही) मोफत लसीकरण करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. या लसीकरणाबाबत व्यापकस्वरुपात जनजागृती करावी. शिबीराला भेटी देवून माहिती घ्यावी, असे आवाहन श्री. आबीटकर म्हणाले.
श्री. जगदाळे म्हणाले, पुणे जिल्ह्यात ‘मॉडेल पीएचसी’च्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देण्याचीसुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामीण स्तरावर रुग्ण कल्याण समितीची भूमिका अत्यंतमहत्त्वाची आहे. या समित्या पुन्हा कार्यान्वित कराव्यात, अशीअपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. विनायक यांनी ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाविषयी माहिती देवून ते पुढे म्हणाले, आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नव्हेतर सार्वजनिक बाब आहे, त्यामुळे आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयालाकेंद्रबिंदू मानून विविध आरोग्य विषय योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहेत. ग्रामीणभागातील नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्याकरिता तळागळापर्यंत पोहोचवून कामकरावे, येत्या काळात हे अभियान शहरी भागात राबविण्यात येईल,असेही डॉ. विनायक म्हणाले.
श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य विषयावर व्यापक स्वरुपात जनजागृतीची आवश्यकताआहे. अभियानाची अंमलबजावणी, नियोजन आणि विविध स्तरांवरील जबाबदाऱ्यायाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
यावेळी श्री.आबीटकर यांच्याहस्ते ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान संदर्भात माहिती पुस्तिकेचेतसेच गीताचे अनावरण करण्यात आले. तसेच अभियानाच्या जनजागृतीकरिता चित्ररथाचा फित कापूनशुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यशाळेत अभियान अंमलबजावणीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्यापूर्वतयारीबाबत संबंधित जिल्हा प्रतिनिधींनी माहिती दिली.
या कार्यशाळेत पुणे विभागातीलसर्व परिमंडळातील उपसंचालक, जिल्हा आरोग्यशल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वरिष्ठअधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा,सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते
