Home Uncategorized डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी महापालिका देणारअधिकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी महापालिका देणारअधिकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम.

11
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणासाठी महापालिका देणारअधिकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम.

पिंपरी, दि. ४ एप्रिल २०२६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसणासाठी आर्थिक स्वरुपात आगाऊ रक्कम म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनेअधिकारी कर्मचाऱ्यांना दरमहा हप्त्याने परतफेडीच्या अटीवर एकरक्कमी १५ हजार रुपयेसण अग्रिम दिला जाणार आहे. याबाबतचा आदेशआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती या सणाच्या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात आगाऊ रक्कमदेण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समितीआणि महापालिका सभेने यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यानुसार प्रत्येकी १५ हजार रुपयेअग्रिम अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटप केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीहा सणासाठी महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी आगाऊ रक्कमदिली जात असल्याचा हा निर्णय महत्त्वाचा समजला जातो.

सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा कमीकिंवा सातव्या वेतन आयोगानुसार पे लेव्हल एस-१७ (वेतन संरचना ४७,६०० – १,५१,१००) पेक्षा कमी असणाऱ्या पात्र सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऐच्छिक स्वरुपात या सण अग्रिमचा लाभ मिळणारआहे. सण अग्रिम म्हणून दिली जाणारी १५ हजार रुपयांची रक्कम सदर लाभ घेतलेल्याअधिकारी,कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मे २०२६ पासून दरमहा १५००रुपयांप्रमाणे १० हप्त्यांमध्ये परतफेड केली जाणार आहे. ही सण अग्रिमाची रक्कम १४एप्रिल २०२६ पूर्वी अदा करावी, असेआदेशात नमूद करण्यात आले आहे

Previous article60000 खर्च कर पकड़े 90 चूहे… महाराष्ट्र हाउसिंग डेवलपमेंट अथॉरिटी में ‘रैट रेस’
Next articleदिंडोरी अपघातास कारणीभूत रस्त्याच्या मधोमधील विहीर ,सिमेंट रस्त्याची विहिरीपर्यंतची धोकादायक बांधणी ९ जणांच्या जीवावर बेतली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here