Home Uncategorized गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्पवेळेत पूर्ण करा – महापौर रवि...

गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्पवेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे

12
0

गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्पवेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे.

पिंपरी, दि. १० एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीनप्रशासकीय इमारत ही केवळ एक इमारत नसून नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार आहे.त्यामुळे कामाची गुणवत्ता अबाधित राखत हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावा.कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम व्हावे, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनादिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथील सायन्सपार्कजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरू असलेल्याकामकाजाची महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेत विविध कामांच्या गुणवत्तेबाबत तसेचप्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनादिल्या.

याप्रसंगी नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य कुशाग्र कदम, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, अनिल भालसाखळे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, बाळू लांडे यांच्यासह विनायक साठे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी कामाची गुणवत्ता अबाधितठेवत प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनाअत्याधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्पमहत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत हीशहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून उभारली जात असून ती नागरिकांसाठी एक सक्षम, सुटसुटीत आणि तंत्रज्ञानाधारित सेवा केंद्र ठरणार आहे. याप्रकल्पामुळे नागरिकांना विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली अधिक जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होतील. त्यामुळेकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता राखणे आणि निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्णकरणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करत कोणतीही तडजोड न करतादर्जेदार काम पूर्ण करावे, असेहीत्यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीच्याकामकाजाबाबत माहिती देताना सांगितले की, नवीन इमारतीचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून प्रत्येकटप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गुणवत्ता, सुरक्षा आणि वेळेचे नियोजन या तिन्ही बाबींवर प्रशासनाचाविशेष भर आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करतआहे.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी यावेळी नवीन प्रशासकीयइमारतीच्या कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली.

Previous articleमहापौर यांच्या हस्ते होणार क्रांतिसूर्य महात्मा जोतीरावफुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आणि विचार प्रबोधनपर्व२०२६ चे उद्घाटन
Next articleमेट्रो का सफर अब और होने वाला है किफायती, छात्रों और पर्यटकों के लिए टिकटों पर 25% की छूट का ऐलान।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here