Home Uncategorized नदीसुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्तीलाप्राधान्य द्या-पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे.

नदीसुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्तीलाप्राधान्य द्या-पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे.

12
0

नदीसुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्तीलाप्राधान्य द्या-पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे.

 

 

पुणे, दि.११: राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीनदी पुनरुज्जीवन कामासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णयशासनाने घेतला असून नदी सुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्तीला प्राधान्य द्यावे असे निर्देश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

राष्ट्रीयनदी संवर्धन योजनेंतर्गत पुणे शहरातील मुळा- मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्याआढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्तआयुक्त पवनीत कौर, महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समितीचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचेअधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुंडेम्हणाल्या, अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जातात;मात्र योग्य देखभालीअभावी ते बंद अवस्थेत असतात. पुणे शहरातील सर्व सुरु असलेले सांडपाणीप्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जातील, त्याबाबत कोणत्याही तक्रारी येणारनाहीत याची महानगरपालिकेने काळजी घ्यावी.

त्या पुढेम्हणाल्या, औंध येथील बोटॅनिकल गार्डनच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कृषी विभागाचीजागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पसुरु करण्यासाठी विविध जिल्ह्यांचा, विभागांचा अभ्यास करुन नवीन धोरण आणले जाईल. बारामतीयेथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय पुणे येथेच राहील यासाठी प्रयत्नकरण्यात येतील. शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.

बैठकीत श्री.नवल किशोर राम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी महानगरपालिका हद्दीत निर्माणहोणारे मैलापाणी व प्रक्रिया क्षमता,अंमलबजावणी आणि निधी पुरवठा, मुख्य मलवाहिन्याव कामाची सद्यस्थिती, प्रकल्पाची आर्थिक स्थिती,प्रकल्पातील अडथळे, वारजे,वडगाव, मुंढवा,मस्त्यबीज केंद्र हडपसर, खराडी, धानोरी, बाणेर, तानाजीवाडी भैरोबा मैलापाणी शुद्धीकरणकेंद्राची माहिती सादर करण्यात आली.

Previous articleउद्धव ठाकरे की शिवसेना को फिर तोड़ने की खबर, एकनाथ शिंदे के ‘ऑपरेशन टाइगर’ से महाराष्ट्र में मचा सियासी भूचाल।
Next articleदावा सलमान की ‘मातृभूमि’ में चीन का नाम नहीं होगा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here