Home Uncategorized आसाममध्ये कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे पाच डबे रुळावरून घसरले; रेल्वे अपघाताने प्रवाशांमध्ये घबराट, बचावकार्य...

आसाममध्ये कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे पाच डबे रुळावरून घसरले; रेल्वे अपघाताने प्रवाशांमध्ये घबराट, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू!

6
0
*गुवाहाटी (प्रतिनिधी):* आसाममध्ये बुधवारी सकाळी कोलकाता-सैरंग एक्सप्रेसला भीषण रेल्वे अपघात झाला. गुवाहाटीजवळील डिगारू रेल्वे स्थानक परिसरात ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. सकाळी सुमारे ६ वाजून ५४ मिनिटांनी ही घटना घडली. या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
मिझोराममधील सैरंगकडे जाणारी ही गाडी दुसऱ्या ट्रेनला मार्ग देण्यासाठी डिगारू स्थानकात घेतली जात असताना लोको पायलटला ट्रेनचा वेग नियंत्रित करता आला नाही. त्यामुळे इंजिनासह पाच डबे रुळावरून घसरल्याची प्राथमिक माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. जखमींवर उपचार सुरू असून, प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातामुळे काही रेल्वे सेवांवरही परिणाम झाला असून, रुळांची दुरुस्ती आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Previous articleदिवाळी मिलन सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे अनोखे वक्तव्य! ‘एकेकाळी मी याच कार्यक्रमात खुर्च्या लावायचो’; 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य
Next articleछठपूजेसाठी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ; रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी, तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची धावपळ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here