अमेरिका इराणने १५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण.

अमेरिका विरुद्ध इराण युद्धविराम केल्याचं जाहीर केल्यानंतर इराणनेही प्रस्ताव स्वीकारला आहे. 15 दिवसांसाठी म्हणजे दोन आठवडे युद्धविराम असेल. या घोषणेनंतर जगभरात एक मोठी दिलासादायक बातमी आहे. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली आहे. या करारामुळे जगाचा श्वास रोखणारा स्ट्रॅट ऑफ होर्मुज हा समुद्री मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली.
सलग अनेक दिवस शंभरी पार गेलेल्या कच्च्या तेलाचा दर आता १०० डॉलरच्या खाली आला आहे. युद्धविरामाच्या बातमीने जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ब्रेंट क्रूडचे दर तब्बल १६ टक्क्यांनी घसरून ९२ डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. तर अमेरिकन क्रूड मध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली असून तो ९५ डॉलरवर स्थिरावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की, “हा युद्धविराम पूर्णपणे इराण ‘होर्मुज’ मार्ग कसा आणि किती लवकर उघडतो, यावर अवलंबून असेल.”
तेलाचे दर कमी झाले असले तरी संकट पूर्णपणे टळलेलं नाही. कमोडिटी एक्सपर्ट रॉबर्ट रेनी यांच्या मते, “पुरवठा लगेच सामान्य होणार नाही. बंद पडलेले तेल विहिरी सुरू करणे आणि जहाजांची पुन्हा तैनाती करणे यासाठी किमान काही महिन्यांचा काळ लागू शकतो.” त्यामुळे बाजारात अजूनही काही प्रमाणात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे
