पिंपरी-चिंचवड : नदी संवर्धन, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. या सायक्लोथॉनमध्ये नागरिकांना मोफत सहभाग घेता येणार असून, नोंदणीही विनामूल्य खुली करण्यात आली आहे.
आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात सायकलप्रेमी, युवक, महिला आणि पर्यावरणप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहभागींसाठी ५ किलोमीटर आणि २५ किलोमीटर असे दोन मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नवशिक्या सायकलस्वारांपासून अनुभवी सायकलपटूंपर्यंत सर्वांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
या सायक्लोथॉनचा प्रारंभ मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील हिंदुभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून होणार आहे. सायकल चालवण्याचा आनंद घेत नदीचे प्रदूषण रोखणे, पाण्याची बचत करणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करणे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. नद्यांचे प्रदूषण कमी करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि भावी पिढ्यांसाठी जलसंपत्ती जतन करणे या संदेशांना या उपक्रमातून व्यापक स्वरूप मिळणार आहे.
इच्छुक नागरिकांनी पोस्टरवरील क्यूआर कोड स्कॅन करून विनामूल्य नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन नदी संवर्धनाच्या चळवळीला हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
-
दिनांक: रविवार, २९ नोव्हेंबर २०२६
-
वेळ: सकाळी ६ वाजल्यापासून
-
स्थळ: आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी, पिंपरी-चिंचवड
-
अंतर: ५ किमी आणि २५ किमी
-
नोंदणी: पूर्णपणे मोफत (पोस्टरवरील QR कोडद्वारे)

