Home Uncategorized पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता.

14
0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता

पिंपरी, दि. २५ मार्च २०२६: पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांना तसेच विविध विभागांशी संबंधित विषयांना येणाऱ्या खर्चास आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित विषयांवर चर्चा करून त्यांना मान्यता देण्यात आली. यामध्ये पीएमपीएमएल संस्थेस महामंडळाच्या सेवकांचा सातवा वेतन आयोग फरक द्वितीय हप्ता अदा करणेसाठी अपवादात्मक बाब म्हणून सन २०२५-२६ च्या संचलन तुटीपोटीची अग्रीम रक्कम अदा करण्यासाठी मान्यता देण्यात आली. तसेच चिखली येथील ५ दशलक्ष लिटर अल्ट्राफिल्ट्रेशन प्लांटमधून प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरविण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

सायकलिंग व शाश्वत दळणवळण उपक्रमांसाठी नागरी संवाद व जनसंपर्क करणेकामी सल्लागार नेमणूकीबाबत व सायकल ट्रॅक, सायनेज बोर्ड व अनुषंगिक इन्फ्रा कामासाठी बीआयसीआय संस्थेकडून अनुदान प्राप्त झाले असून विषयांकित कामाचा खर्च या अनुदानातून केला जाणार आहे. त्यानुसार फी अदा करण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ८ मधील बालाजीनगर येथील तसेच प्रभाग क्र. ७ मधील शांतीनगर झोपडपट्टीमधील जुने, जीर्ण मोडकळीस आलेले सामुदायिक शौचालय पाडून त्याठिकाणी नवीन सामुदायिक शौचालय उभारण्यास येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

याशिवाय, विविध ठिकाणचे जलतरण तलाव भाडेतत्वावर चालविणेस देणे, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करणे, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या कामकाजाकरिता पालिकेतील अंशदायी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, विविध विभागांसाठी आवश्यक लॅपटॉप खरेदी करणे, क्षेत्रीय कार्यालयांसाठी औष्णिक धुरीकरण करण्यासाठी वॅन फॉग मशिन ठेवून कामकाज करण्यासाठी आवश्यक वाहने भाड्याने घेणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समिती सभेत मंजुरी दिली.

Previous articleउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र,
Next articleNCP विधायक के खिलाफ फैलाई फेक न्यूज, महाराष्ट्र विधान परिषद ने अकोला के युवक को दी 5 दिन जेल की सजा।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here