भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जीवनावरील आधारित पुस्तकाचे वाटप शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेच्या विद्यमाने.

शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेच्या विद्यमाने आज दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता
पुणे महानगरपालिकेच्वया छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जीवनावरील आधारित पुस्तकाचे वाटप
पुणे महानगरपालिकेतील विध्यार्थ्यांना मा,मंजुषा दीपक नागपुरे,महापौर पुणे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा.अॅड.निलेश निकम विरोधी पक्ष नेते, मा.अरुण राजवाडे अध्यक्ष,शिक्षण समिती, मा.अॅड.क्षितीज गायकवाड (व्याख्याते), मा.हिमानी कांबळे,पक्षनेत्या आर.पी.आय.(आ.), मा.वसुंधरा बारवे, उपायुक्त, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग पुणे मनपा, मा.सुनंदा वाखारे,प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पुणे मनपा, मा.आशा उबाळे,माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी, श्री.माणिक देवकर, क्रीडा विभाग प्रमुख, सर्व क्रीडाधिकारी, माध्यमिक शाळांचे शालाप्रमुख,तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
आपल्या मनोगतात महापौर मा. मंजुषा नागपुरे यांनी डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र उलगडून सांगताना, शिका संघटीत व्हा व संघर्ष करा असा संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी समाजापलीकडे जाऊन आपला विवेक जागृत करून अन्यायाविरुद्ध लढा देऊन स्वतःला सिद्ध केले. आपण समाजात कसे वागतो यावर आपली राष्ट्रभक्ती अवलंबून असते. आपण स्वतः शिकून सक्षम ह्वावे व इतरांना हि सक्षम करावे, एखादा युवक स्त्रीचा आदर करतो तेंव्हाच तो राष्ट्रहित जपतो. विद्यार्थी हा रडणारा नाही तर लढणारा असावा, समाज घडविणारा असावा. कोणीही उच्च नीच नाही तर सर्व समान आहेत. आयुष्य मोठे असण्यापेक्षा ते महान असावे. तरुणांनी चांगल्या विचारांनी समाजात वावरावे व राष्ट्राचे नाव मोठे करावे असा संदेश दिला.
मा. निलेश निकम विरोधी पक्षनेते, यांनी आपल्या संदेशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिण्याचे मोठे काम केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यांच्या जीवनावरील जेवढी पुस्तके आपणास मिळतील त्यांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे सांगितले .
मा.अॅड.क्षितीज गायकवाड यांनी आपल्या ‘ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावरील व्याख्यानात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध ग्रंथ संपदेबद्दल माहिती देऊन हिंदू कोडबिल, महिलांना मिळालेले विविध अधिकार, एकपत्नी कायदा, या बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार वसुंधरा बारवे उपायुक्त, प्राथमिक व माध्यमिकशिक्षण विभाग पुणे मनपा यांनी मानले .
