Home महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने होणार ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने होणार ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा नागरी सन्मान

8
0
पिंपरी, दि. २६ फेब्रुवारी २०२६ : मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि लोककलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तमाशा या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेला दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत भारत सरकारकडून पद्मश्री जाहीर झालेले ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांचा महापालिकेच्यावतीने नागरी सत्कार केला जाणार आहे.

सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान केला जाणार आहे. “तमाशा – मराठी भाषा संवर्धन करणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकचळवळ” या विषयावर खेडकर विचार मांडणार आहेत.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे, महापालिकेचे उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.
दुपारी १२ वाजता लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई यांच्यातर्फे “माय मराठीची गौरवगाथा” हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल. मराठी भाषा, तिची परंपरा आणि सांस्कृतिक ओळख यांचे दर्शन घडविणारा हा कलाविष्कार रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरेल. संदेश विठ्ठल उमप, शाहीर पृथ्वीराज माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा यात सहभाग असणार आहे.
यानंतर दुपारी ३ वाजता स्थानिक कवींचा सहभाग असलेले कविसंमेलन पार पडणार आहे.  या कार्यक्रमात राज अहेरराव अध्यक्षस्थान भूषवतील. तद्नंतर दुपारी ४ वाजता “अभिजात मराठी भाषेचे वैभव” या विषयावर चिंतनपर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या चर्चेत अरुण बोऱ्हाडे, प्रकाश निर्मल आणि डॉ. धनंजय भिसे हे मान्यवर सहभागी होऊन मार्गदर्शन करतील.
सायंकाळी ६ वाजता “आवाज लोकगीतांचा… गंध मराठी मातीचा…” या कार्यक्रमातून मराठी लोकगीतांची सुरेल मैफल रंगणार आहे. लोकगायक विजय सरतापे, जगदीश गोरसे, विशाल ओव्हाळ, राणी म्हस्के आणि धीरज वानखेडे हे गायक गीते सादर करणार आहेत.
मराठी भाषेचा अभिमान आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन यांचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले आहे.
Previous articleBMC Budget 2026-27: एफडी तोडून मुंबईच्या विकासाला गती; मुंबईकरांवर नवा कर नाही
Next articleपुण्यात MIT-ADT विद्यापीठाचा राष्ट्रीय सेमिनार; सेमिकंडक्टर निर्मितीत भारताने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी – प्रा. डॉ. मंगेश कराड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here