Home Uncategorized मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात...

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

5
0

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

Pune::मार्च महिन्याला सुरूवात झाली असून राज्यातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. सतत पाऊस सुरू आहे. काल झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.हवामान विभागाने नुकताच पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला.

राज्यातील इतर भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पुढील काही तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात  वेगाने वारे वाहतील आणि  विजांच्या कडकडाटासोबत पाऊस हजेरी लावेल.या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा फळपिके यांचे नुकसान झाले आहे.

Previous articleजलवाहतुकीत क्रांती: मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग.
Next articleपुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here