Home Uncategorized रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .

रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .

18
0

रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .

पुणे::नाशिकचा  भोंदू बाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी वादग्रस्त संबंधांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टीकेचा सामना करावा लागला. न्यू मराठी अंकशास्त्रच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील अशोक खरात अत्याचाराच्याआरोपाखाली अटक झाली आहे.

अटक झाल्यावर त्याच्या कृत्याचे पुरावे पोलिसांना मिळाले.याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आले होते. त्यामुळे रुपाली चाकणकरांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली. 

या सर्व घटनान नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Previous articleMovie:OTT पर मौजूद ‘शापित’ Horror Movie देख एक
Next articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाचे प्रकाशन’ तसेच निर्देशांकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा गौरव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here