महापौर यांच्या हस्ते होणार क्रांतिसूर्य महात्मा जोतीरावफुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आणि विचार प्रबोधनपर्व२०२६ चे उद्घाटन.

पिंपरी, दि. १० एप्रिल २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनेक्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणिभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ११ ते १७ एप्रिल२०२७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भीमसृष्टी) येथे सामाजिक समता सप्ताह आणि विचार प्रबोधनपर्व २०२६ चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्धाटन शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर रवि लांडगेयांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूकराज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्याउपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेषउपस्थिती असणार आहे. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर मांडेकर, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे तसेचनगरसदस्य सिद्धार्थ बनसोडे, राहुलभोसले,कुशाग्र कदम, तुषार हिंगे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे), सारिका मासुळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यांच्यासहविशेष अतिथी म्हणून डॉ. भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती असणार आहे. तर महापालिकेचेअतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे तसेच नगरसदस्य, नगरसदस्या व अधिकारी यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.
प्रबोधनपर्वाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात सकाळी १०.१५वाजता शारदा मुंडे यांच्या ‘मी जोतीबाची सावित्री’ हा एकपात्री नाट्यप्रयोगानेहोईल. त्यानंतर ११.३० वाजता शाहीर राजेंद्र कांबळे व सहकारी यांचा शाहिरी जलसा तरदुपारी १ वाजता साधना मेश्राम व मंजुषा शिंदे यांची गीत गायनाची मैफिल आयोजितकरण्यात आली आहे. दुपारी २.३० वाजता थिएटर वर्कशॉप कंपनी प्रस्तुत महात्मा फुलेलिखित ‘तृतीय रत्न’ हे नाटक सादर होणार आहे. सायंकाळी ४ वाजता काव्यभूमी संस्थेचा‘गाथा साऊ जोतीची..’ हा कवितामय कार्यक्रम होणार असून सायंकाळी ५.३० वाजता ‘महात्माफुले यांना अभिप्रेत समाजव्यवस्था’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र राज्य सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, मुंबई विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना महाजन, संविधान अभ्यासक नुरखा पठाण, दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या अँड. दिशा वाडेकर हे सहभागीहोणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता कव्वाल फैजान ताज यांचा ‘क्रांतिसूर्यालासलाम’ हा प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दिवसाची सांगतारात्री ८.३० वाजता तेजांकुर बहुउद्देशीय संस्था, अमरावती प्रस्तुत ‘जोतिबांची सावली…सावित्री माऊली…’ यादोन अंकी ऐतिहासिक नाटकाने होणार आहे.
या प्रबोधनपर्वाद्वारे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रमांच्या माध्यमातून महात्माजोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेजस्वी विचार सर्वसामान्यांपर्यंतपोहोचविण्याचा महापालिकेचा मानस आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितराहून महापुरूषांच्या कार्याचा जागर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यातआले आहे.
