
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे चोरीच्या संशयावरून वडिलांनी दोन पोटच्या मुलींना रात्रभर उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोरआली आहे, ज्यात १० वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला असून बहीण गंभीर जखमी आहे.
या निर्दयी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे
यमगर कुटुंबीय आटपाडीच्या बनपुरी येथे वास्तव्यास आहे.कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने चोरीचा आळ घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलींना रात्रभर उलटे टांगून अमानुष मारहाण केली.दोन्ही मुली पिण्यासाठी पाणी मागत असतानाही दादू यमगर या बापाने मुलींना पिण्यासाठी पाणी दिले नाही.
