बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी‘ईसीआयनेट’ची सोय;उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर.
पुणे, दि. 6 एप्रिल बारामतीपोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना उमेदवारांविषयी सविस्तर व पारदर्शक माहितीसहज उपलब्ध करून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘ईसीआयनेट’या एकात्मिक डिजिटल व्यासपीठाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातूनमतदारांना उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता व दायित्वे,शैक्षणिक पात्रता तसेच अधिकृत सामाजिक माध्यमांवरील खात्यांची माहिती‘आपला उमेदवार जाणून घ्या’ या घटकाद्वारेपाहता येणार आहे.
मतदारांना ईसीआयनेटमधील “निवडणूक प्रक्रिया” या विभागांतर्गतहा घटक सहज उपलब्ध असून, त्याद्वारे उमेदवारांनी सादर केलेलेसंपूर्ण प्रतिज्ञापत्र (फॉर्म 26) देखील उतरवता येणार आहे. यामुळेमतदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
ईसीआयनेट हे जगातील सर्वात मोठेनिवडणूक सेवा व्यासपीठ असून, भारतातील निवडणूकप्रक्रियेशी संबंधित 40 हून अधिक अॅप्स व संकेतस्थळे एकत्रितकरून एकसंध डिजिटल अनुभव देण्यात आला आहे. या व्यासपीठाद्वारे मतदार नोंदणी,मतदार यादी शोध, अर्जाची स्थिती पाहणे,निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क, मतदान केंद्रस्तरीयअधिकाऱ्यांशी संवाद, ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड, मतदानाचे प्रवाह तसेच तक्रार निवारण यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.
याशिवाय, ईसीआयनेटवर ‘सी-सिव्हिजल’ या अॅपद्वारे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविता येतात, तर ‘सक्षम’ उपक्रमाद्वारे दिव्यांगमतदारांसाठी सुलभ सेवा पुरविण्यात येत आहेत. या सर्व सुविधा एकाच सुरक्षित व्यासपीठावरउपलब्ध असल्याने मतदारांना तत्काळ माहिती व तक्रार निवारणाची प्रभावी सोय मिळत आहे.
बारामती पोटनिवडणुकीत पारदर्शक, सुजाण आणि सक्रियमतदानासाठी मतदारांनी ईसीआयनेटचा अधिकाधिक वापरकरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्रडुडी यांनी केले आहे
