पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! महापालिका प्रशासनाने केले आवाहन.

कडक उन्हाळा आणि वाढत्या मागणीमुळे शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.पवना धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.
पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. शनिवारी (दि. ४) सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, धरणात आता केवळ ४६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जून अखेरपर्यंत म्हणजेच पावसाळ्याच्या आगमनापर्यंत शहराला पुरेल इतकाच असल्याने, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
पिंपरी चिंचवड शहराला मुख्यत्वे मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दररोज रावेत येथील बंधाऱ्यातून ५२० एमएलडी पाणी उचलते. याव्यतिरिक्त: एमआयडीसी: शहराच्या काही भागांसाठी ३० एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
