Home Uncategorized महापालिकेतील चुकीच्या कामांवर अंकूश हीच भाजपाची कार्यप्रणाली!

महापालिकेतील चुकीच्या कामांवर अंकूश हीच भाजपाची कार्यप्रणाली!

12
0

महापालिकेतील चुकीच्या कामांवर अंकूश हीच भाजपाची कार्यप्रणाली!

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षा शत्रुघ्न काटे यांची भूमिका

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल ५२ कोटी रुपयांची बिले लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अदा केली. यामध्ये ठकेदार किंवा नगरसेवक यांचा दोष नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांने अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यावर भाजपाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पर्दाफाश केला. पिंपरी-चिंचवडकरांनी विश्वासाने सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेची संधी दिली. त्यामुळे शहरवासीयांच्या विश्वासाला आम्ही कदापि तडा जावू देणार नाही. ‘‘चुकीच्या कामांना अंकूश हीच भाजपाची कार्यप्रणाली आहे’’ अशी भूमिका भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मांडली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील तब्बल ५२ कोटी रुपयांच्या आर्थिक प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी यावर प्रकाश टाकला आणि कारवाईची मागणी केली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका विधी व कायदा विभागाने सदरबाबत लेखी अभिप्राय नोंदवला आहे. ‘‘लेखा विभागाकडून अदायगी केलेली बिलांना स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता घेणे बंधनकारक आहे.’’ असा अभिप्राय आला. त्यामुळे जैन यांच्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश झाला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली आणि ५२ कोटी रुपयांच्या बिलांबाबत चुकीच्या उपसूचनांवर केवळ भाजपाच्या नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत. त्यामध्ये आमच्या नगरसेवकांचा संबंध नाही, अशी भूमिका मांडली. त्याद्वारे या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, काही बिलांच्या उपसूचनांवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्याही सूचक- अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहेत. मग, त्याची जबाबदारी संबंधित नगरसेवकांची आहे, अशी भूमिका मांडणे उचित नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकीय उद्देशाने वातावरण निर्मिती करु नये, असे आवाहनही शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.

“महापालिकेतील विविध ठेकेदारांनी ५२ कोटी रुपयांची बिलांसंदर्भात उपसूचनांवर नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेवून नियमबाह्यपणे बिल अदायगी केल्याप्रकरणी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. विधी व कायदा विभागानेही अभिप्राय नोंदवला आहे. महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपाने अर्थसंकल्पामध्ये असलेल्या त्रूटी दूर करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर आता लेखा विभागाच्या चुकीच्या कामाला प्रतिबंध करण्यात आला. पिंपरी-चिंचवडकरांनी दिलेली जबाबदारी सक्षमपणे आणि पारदर्शी कारभार या भावनेतून आम्ही पार पाडत आहोत.

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

 

 

 

 

Previous articleआज आईपीएल 2026 में बड़ा मुकाबला खेला जाएगा
Next articleराजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here