Home Uncategorized शाळा बसचे (School Bus) भाडे आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) निश्चित करणार.

शाळा बसचे (School Bus) भाडे आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) निश्चित करणार.

8
0

शाळा बसचे (School Bus) भाडे आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) निश्चित करणार.

सर्व पालकांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने शालेय बस व्यवस्थेत मोठे बदल करण्याची तयारी घेतली आहे. आतापर्यंत स्कूल बस चालकांकाडून आकारले जाणारे ते मनमानी भाडे आहे ते आता नियंत्रणात येणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने २०२६ च्या नवीन नियमांनुसार, शाळा बसचे (School Bus) भाडे आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) निश्चित करणार असून, वर्षाचे आगाऊ भाडे घेण्यास मनाई केली आहे, तर मासिक भाडे पद्धत लागू केली आहे . बसमध्ये महिला कर्मचारी अनिवार्य असून, सुरक्षिततेसाठी दर महिन्याला भाडे देण्याचा पालकांना दिलासा मिळाला आहे.शिवाय जीपीएस, पॅनिक बटण आणि सुरक्षा नियमांमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढणार आहे.

या माहिती नुसार शालेय तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी कडक नियम लागू करण्यात येतील.शिक्षण तसेच परिवहन विभाग मिळून शालेय वाहनांची दररोज तपासणी केली जाईल आणि या तपासणीचेही अहवाल जिल्हा स्तरावर सादर करण्यात येतील.

आता नवीन नियमांनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची बसमध्ये चढताना तसेत उतरतानाही नोंद ठेवणे आवश्यक असणार आहे तसेच लहान मुलांसाठी म्हणजेच इयत्ती पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक बसमध्ये परिचारिका किंवा जबाबदार कर्मचारी असणे बंधनकारक असेल आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा तसेच प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे असेल.

Previous articleAsha Bhosle, स्टूडियो में पसरा सन्नाटा; दिलचस्प है Rekha के उस गीत की कहानी
Next articleभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जीवनावरील आधारित पुस्तकाचे वाटप शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेच्या विद्यमाने.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here