Home Uncategorized पुणेकरांनसाठी एक महत्त्वाची बातमी,पुणे  ते तरुपतीला जाण्यासाठी नवीन फ्लाइट ही सेवा सुरु.

पुणेकरांनसाठी एक महत्त्वाची बातमी,पुणे  ते तरुपतीला जाण्यासाठी नवीन फ्लाइट ही सेवा सुरु.

14
0

पुणेकरांनसाठी एक महत्त्वाची बातमी,पुणे  ते तरुपतीला जाण्यासाठी नवीन फ्लाइट ही सेवा सुरु होणार आहे.

पुणे :पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली. पुणे विमानतळावरून आता तिरुपतीला जाण्यासाठी नवीन फ्लाइट सेवा सुरु होणार आहे.यामुळे प्रवासाचा अधिक वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुकर होणारआहे. विमानतळावर एक दोन नाही,तर 15 अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्स मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे थेट पुणे ते तिरुपती हा सुखद आणि जलद प्रवास होईल.  

यामुळे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या 220 वरून 235 झाली आहे. या निर्णयामुळे पुणे शहराची तिरुपती, मंगळुरू आणि बागडोगरा यांसारख्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

पुणे-तिरुपती फ्लाइट सुर

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे ते तिरुपती हा प्रवास आता सोलापूरमार्गे होणार आहे. हा नवीन रूट असा असेल: पुणे – सोलापूर – तिरुपती. ही सेवा स्टार एअर (Star Air) कडून सुरू करण्यात येणार आहे.

ही नवीन सेवा 1 मे 2026 पासून सुरू होणार आहे. ही फ्लाइट आठवड्यातून 6 दिवस (शनिवार वगळता) उपलब्ध असेल. पुण्यात फ्लाइट दुपारी सुमारे 3:20 वाजता येईल आणि 4:00 वाजता पुढे जाईल.

प्रवाशांना काय फायदा?

सध्या पुणे ते तिरुपती जाण्यासाठी प्रवाशांना हैदराबाद किंवा बेंगळुरूमार्गे कनेक्टिंग फ्लाइट घ्यावी लागते. यासाठी 4 ते 6 तास लागू शकतात. पण नवीन रूटमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन अंदाजे 1 तास 45 मिनिटांचा होईल (थेट सेवा उपलब्ध झाल्यास)

तिकीट दर किती असतील?

सध्या कनेक्टिंग फ्लाइट्सचे तिकीट 3,500 रुपये ते 7,500 रुपयांच्या दरम्यान आहे. ही फ्लाइट सेवा UDAN (उडान – उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत सुरू होत आहे. यामुळे छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्याचा उद्देश साध्य होणार आहे. थोडक्यात पुणेकरांसाठी तिरुपतीचा प्रवास आता अधिक सोपा, वेगवान आणि किफायतशीर होणार आहे.

Previous articleयश की मोस्ट अवेटेड फिल्म ‘टॉक्सिक’ की रिलीज डेट बदलने को लेकर एक बार फिर से अफवाहों का बाजार गर्म हुआ था।
Next articleमुंबई में उमस भरी गर्मी बनी आफत, पुणे समेत महाराष्ट्र के कई जिलों में तापमान 40 पार, पढ़िए मौसम विभाग का अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here