Home Uncategorized पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 23 आणि 24 एप्रिल रोजी 3 तास राहणार बंद:...

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 23 आणि 24 एप्रिल रोजी 3 तास राहणार बंद: पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन.

4
0
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 23 आणि 24 एप्रिल रोजी 3 तास राहणार बंद: पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन.

Mumbai-Pune  ExpresswayTraffic Update:यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगाव परिसरातील पुलाच्या दुरुस्ती व रंगकामासाठी येत्या दि. २३ आणि २४ एप्रिल रोजी प्रत्येकी तीन तास वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाने आज, २३ एप्रिल रोजी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२:०० ते ३:०० वाजेपर्यंत हा ब्लॉ असणार आहे. या वेळेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहने किवळे देहूरोड, तळेगाव आणि राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे कुसगाव टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेला वळविण्यात येतील. त्यानंतर उद्या, शुक्रवारी पुणे वाहिनीवरील पुलाचे शटरींग काढण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरही तीन तासांचा ब्लॉक असेल. हा ब्लॉक देखील दुपारी १२:०० ते ३:०० वाजेपर्यंत असेल. या ब्लॉकदरम्यान, पुणे वाहिनीवरील वाहतूकही राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून वळवण्यात येईल.

या काळात द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना अडचण आल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी केले आहे.

दुपारच्या कडक उन्हात तीन तास वाहतूक वळवण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागण्याची आणि प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच आपला प्रवास सुरू करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous articleग्रामपंचायतीं पोटनिवडणुकांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
Next articleमैलापाणी प्रक्रिया न करता सोडणाऱ्या खासगी मैलाशुद्धीकरण केंद्रावर महापालिकेची कारवाई..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here