Home Uncategorized मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते

9
0

वेद म्हणजे विज्ञानाधिष्ठित जीवनमार्ग

नागपुर: दि:१९, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्त आज नागपूर येथे स्व. निरंजनभाई ठाकर यांच्या स्मारकाचे अनावरण व निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले वेद हे जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. वैज्ञानिक संशोधनांमधून वेदांचे अस्तित्व 12,000 वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे निदर्शनास येते. जगातील सर्वात जुनी संस्कृती, भाषा आणि ज्ञान हे भारतात वेदांच्या रूपाने नांदते.

संपूर्ण आयुष्याचे ज्ञान वेदांच्या माध्यमातून प्राप्त होते, आणि हे सर्व ज्ञान वैज्ञानिक आहे. अथर्ववेदात वैज्ञानिक पद्धतीने जीवनपद्धतीचा निर्वाह कसा करावा, याचे ज्ञान आम्हाला मिळते. समृद्ध जीवनपद्धतीचे सविस्तर मार्गदर्शन करणारे असे दिव्य ज्ञान आपल्याला वेदांच्या माध्यमातून प्राप्त होते. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते

Previous articleअक्षय कुमार की फिल्म भूत बंगला की कमाई दिन-ब-दिन बढ़ रही है। तीसरे दिन भी कमाई में बड़ा उछाल आया।
Next articleगोल्डन लाईन मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडेल; सिडकोने मेट्रो लाईन ८ च्या कामाला गती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here