Home Uncategorized लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद” – महापौर रवि लांडगेनिगडीयेथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत...

लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद” – महापौर रवि लांडगेनिगडीयेथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन….

11
0

लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद” – महापौर रवि लांडगेनिगडीयेथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन….

 

झाडेलावून पर्यावरणाचे रक्षण करण्याची नागरिकांनी घेतली शपथ…

पिंपरी,दि. ३ एप्रिल २०२६ :- “लोकसहभागातून उभे राहणारेउपक्रम हीच शहर विकासाची खरी ताकद आहे, निगडी परिसरातील नागरिकआणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेला ऑक्सिजन पार्क हा एक अनोखाआदर्श असा पर्यावरणपूरक उपक्रम आहे असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी निगडी प्राधिकरणयेथील ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटन प्रसंगी केले.

निगडीप्राधिकरण येथील सेक्टर २६ मध्ये स्थानिक रहिवासी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यासहभागातून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्याहस्ते उत्साहात पार पडले,त्यावेळी ते बोलत होते.

याकार्यक्रमास आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिलाबाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिकाआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य अमित गावडे यांच्यासह महापालिकामुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंता सुनीलपवार, दिलीप भोसले, जयकुमार गुजर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच राजेंद्रबाबर, विजय नाईक, धनंजय शेडबाळे,सुर्यकांत मुथियान व ऑक्सिजन पार्क उभारण्यात सक्रिय सहभाग नोंदविणारे परिसरातीलनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौररवि लांडगे म्हणाले की, पर्यावरण संवर्धन हीसामूहिक जबाबदारी असून अशा हरित प्रकल्पांमुळे पिंपरी चिंचवड शहर हे अधिक आरोग्यदायीआणि सुंदर बनेल. तसेच शहरातील २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये अशी संकल्पनालोकसहभागातून राबविण्यात येईल, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनाचा निर्धारव्यक्त करण्यात आला.

माझीवसुंधरा शपथ

“आम्ही भारताचे सुजाण नागरिक म्हणून शपथ घेतो की,आम्हीभारतमातेला आणि या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला आणि पर्यावरणाला आमच्याकडून कोणतीही हानी होणार नाही,याची आम्ही दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठीकटिबद्ध राहू आणि आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही.जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला आणि वसुंधरेला स्वच्छ, सुंदर,हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्लपुराणिक यांनी केले.

 

 

Previous articleधुरंधर 2 रणवीर सिंह की स्पाई थ्रिलर फिल्म, 15वें दिन तक वर्ल्डवाइड 1,492 करोड़ रुपये कमाई कर 1500 करोड़ क्लब में शामिल होने के करीब।
Next articleRamayana के मेकर्स ने ठुकराई 700 करोड़ की OTT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here