राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ.
ऑक्टोबर ते जानेवारी या हिवाळी महिन्यांत AQI (हवेची गुणवत्ता) अनेकदा ४००-५०० च्या वर (धोकादायक श्रेणी) जाते .

वाहनांचा धूर, बांधकाम धूळ, औद्योगिक प्रदूषण आणि शेजारील राज्यांतील पराली (पिकांचे अवशेष) जाळल्यामुळे ही परिस्थिती ओढवते, ज्यामुळे आरोग्य आणीबाणीसदृश स्थिती निर्माण होते .
राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाचा निर्णायकपणे सामना करण्यासाठी, सरकारने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण २०२६-२०३० चा नवीन मसुदा प्रसिद्ध केला आहे. या धोरणाद्वारे, प्रदूषणाच्या एका प्रमुख स्रोतावर थेट हल्ला करत, येत्या काही वर्षांत पेट्रोल आणि डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करणे, हे सरकारचे स्पष्ट उद्दिष्ट आहे.
