महाराष्ट्रात, पुढील ३ ते ५ दिवस तीव् उष्णतेच्या लाटेचा इशारा.

पुणे, १४एप्रिल २०२६:अवकाळी पावसानंतर वातावरणातील उष्णता वाढली आहे.अनेक ठिकाणी पारा हा 40 अंश सेल्सिअस पार गेलाय. असं असताना हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप म्हणाले की, पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 – 45 डिग्री सेल्सिअस पार जाण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा असून, अकोला जिल्ह्याचा पारा 43 वर आहे. हा पारा पुढील दोन दिवसात 45 अंशावर जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात, पुढील ३ ते ५ दिवस (१४ ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान) तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांत तापमान ४३°C च्या वर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात दुपारी बाहेर पडणे टाळा आणि हायड्रेटेड राहा.
अमरावतीमध्ये तापमान 42 डिग्री असून, पुढील दोन दिवसात 45 डिग्री जाण्याची शक्यता आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 डिग्री पार जाणार आहे. त्यामुळं नागरिकांनी पुढील 5 दिवस विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्याचं तापमान 42 – 45 डिग्री अंशावर जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर विदर्भातील जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी पुढील 5 दिवस सकाळी 12 नंतर गरज असेल तरच बाहेर पडा, असा सल्ला पुणे हवामान विभागानं दिलाय.
महाराष्ट्र सरकारनं नियमावली (SOP) जाहीर केलीय.
या नियमांनुसार ऑरेंज आणि रेड हीट अलर्टच्या काळात दुपारी 12 ते 4 या वेळेत कामगारांना विश्रांती देणे बंधनकारक असेल. तसंच कामाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 अशी ठेवावी लागेल. देशातील उष्णतेसाठी अतिसंवेदनशील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उष्माघात आणि आपत्ती या प्रकारामध्ये देशातील पहिल्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर येतो.
